शासकीय आश्रमशाळांत झाला दूध घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांचा गंभीर आरोप

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे आमदार रोहित पवार यांनी केला. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले.

शासकीय आश्रमशाळांत झाला दूध घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांचा गंभीर आरोप

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.  आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले. एका निनावी व्यक्तीने आपल्याला ११ फाइल्स पाठवल्या असून हा व्यक्ति सत्ताधारी पक्षाचाच असल्याचा दावा त्यांनी केलाय.  त्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी रोहित पवार यांनी दोन फाइल्स दाखवल्या.  (Milk Scam)

रोहित पवार म्हणाले, राज्यात एकूण ५५२ आश्रमशाळा असून त्यामध्ये १८७३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शासकीय धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज २५० मिलीलिटर इतके दूध देणे बंधनकारक आहे. हा दूध पुरवठा करण्यासाठी कंत्राट काढले जाते. जो सगळ्यात कमी बोली लावेल त्याला कंत्राट दिले जाते. २०१८-१९ मध्ये ४६.४९ आणि ४९.७५ रुपये प्रती लिटर अशा निविदा काढल्या होत्या. मात्र २०२३-२४ मध्ये शासनाने एक लिटर दूध १४६ रुपये या दराने खरेदी केले. यामध्ये एकूण ८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी  केला आहे.  हे कंत्राट मिळवणाऱ्या कंपन्या या पुण्यातील आंबेगाव तालुका आणि कोल्हापूर येथील सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. 

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, शेतकऱ्यांकडून ३० रुपये दराने घेतलेले दूध गरीब मुलांना १४६ रुपये दराने दिले जात असून याविरोधात प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री  कार्यालय, अ‍ॅन्टी करप्शन कडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest