‘मविआ एकत्र निवडणुका लढवणार’

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील ऐक्य आणि पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी सक्रिय झालेल्या पवरांनी बुधवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. महाविकास आघाडी मजबूत करण्याबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचे संकेत त्यांनी दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 18 May 2023
  • 04:22 pm
‘मविआ एकत्र निवडणुका लढवणार’

‘मविआ एकत्र निवडणुका लढवणार’

राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत शरद पवार यांचे प्रतिपादन

#मुंबई

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढील पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील ऐक्य आणि पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी सक्रिय झालेल्या पवरांनी बुधवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. महाविकास आघाडी मजबूत करण्याबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचे संकेत त्यांनी दिले.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या देताना आमदारांना सूचना दिल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे  पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सद्यस्थितीचा पवार यांनी आढावा घेतला. तसेच ज्येष्ठ नेत्यांना काही सूचना देखील दिल्या. महाविकास आघाडी भक्कम ठेवा. लोकसभा, विधानसभा मविआतूनच लढू, अशी सूचना देत राष्ट्रवादी सोडण्याचा मनसुभा असलेल्या पक्षातील नेत्यांचे शरद पवार यांनी कान टोचले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभ-विधानसभा निवडणूक लढवायची आहे. कर्नाटक मध्ये जो कल आहे तो महाराष्ट्रात आहे. भाजप नको. त्यांची सत्ता येऊ नये असा मतदारांनी कौल दिला आहे. त्याचा मान ठेवून आपणाला जनतेपर्यंत पोहचावे लागले. त्यासाठी सर्वांनी झटून कामाला लागावे, असे आवाहन पवार यांनी या वेळी केल्याचे कळते. 

भाजप विरोधातील पक्षांची आणि नेत्यांची गळचेपी करत आहे. जो पक्ष भाजप बरोबर जाईल त्यांना कर्नाटकच्या मतदारांनी मते दिली नाहीत. तसेच चित्र महाराष्ट्रात आहे, असेही पवारांनी सांगितले. या वेळी  ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याची जबाबदारी विभागावर नेत्यांना दिली.  उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसे, कोकणची सुनिल तटकरे आणि ठाणे पालघरची धुरा जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest