संग्रहित छायाचित्र
प्रकृती बिघडल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण १७ दिवसांनी स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कधी आंदोलन तर कधी उपोषण या मार्गांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपला लढा सुरू ठेवला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी 'सगेसोयरे' संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी काढलेल्या अधिसुचनेचं पालन व्हावं असा त्यांचा आग्रह असून मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण मिळूनही ते समाधानी नाही. (Maratha Reservation)
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. मात्र वाटेतच त्यांची प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा आंतरवली सराटीमध्ये परतले. दरम्यान आज दुपारी त्यांनी आपले १७ दिवस चाललेलं उपोषण त्यांनी सोडलं आहे.
दरम्यान बेमुदत उपोषणाचं साखळी उपोषणात रूपांतर करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. असेच साखळी उपोषण राज्याच्या इतर भागांतही व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.