संग्रहित छायाचित्र
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली देखील होणार आहे. ६ ऑगस्टला मनोज जरांगे तुळजापुरात मुक्कामी होते. त्यानंतर आज (बुधवारी) ते सोलापूरात दाखल झाले. जरांगे पाटील शांतता रॅलीचे सोलापूरात जंगी स्वागत झाले. यावेळी ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना एकत्रित करणार आहेत.
यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा करून शांतता रॅली काढली होती.
मनोज जरांगे पाटील यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल:
७ ऑगस्ट - सोलापूर
८ ऑगस्ट - सांगली
९ ऑगस्ट - कोल्हापूर
१० ऑगस्ट - सातारा
११ ऑगस्ट - पुणे
१२ ऑगस्ट - नगर
१३ ऑगस्ट - नाशिक
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी विविध विषयांमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. यामध्ये आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल आहे. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरला होता आता विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजणार आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ ऑगस्ट ही तारीख दिली आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे.