संग्रहित छायाचित्र
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (८ जून) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ४ जूनच्या तारखेत बदल करून ८ जूनला उपोषण करणार असल्याचं सांगितलं होतं.
राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच, आमचं ध्येय मराठा आरक्षण मिळवणं हेच आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्व २८८ मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे उमेदवार उभे करणार. तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार. अशा इशारा त्यांनी अंतवाली सराटी येथून माध्यमांशी बोलत असताना दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची मागणी असलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी. याच मागणीसाठी मी पुन्हा एकदा उपोषणाला बसलो आहे. हा कायदा करण्यासाठी सरकारला काही पुरावे हवे असतील तर तब्बल ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्याचंही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
आमच्या आंदोलनाविरोधात काही निवेदनं जाणीवपूर्वक देण्यात आली आहेत. भविष्यात तुमच्याही रॅली निघतील. मग आम्हीही अशा प्रकारची निवेदनं देवू. मग तुम्ही तुमची रॅली रद्द करणार आहात का? अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी यावेळी दिली.