मै अपनी झांशी नहीं दुंगी,भावना गवळी कडाडल्या

शिवसेनेकडून यवतमाळ मतदारसंघ (शिंदे गट) जाण्याच्या कथित वृत्तावर जोरदार प्रतिक्रिया

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 29 Feb 2024
  • 02:59 pm
emotionswerestrong

मै अपनी झांशी नहीं दुंगी,भावना गवळी कडाडल्या

#यवतमाळ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी होणाऱ्या महिला मेळाव्या निमित्त जागोजागी लावलेल्या जाहिरातीत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याने महायुती दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी करत असल्याच्या चर्चेला गवळी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मै अपनी झांशी नहीं दुंगी, असे प्रतिपादन करत  भावना गवळी  यांनी आपण उमेदवारीबाबत ठाम असल्याचे सांगत यवतमाळ मतदारसंघावर आपलाचा दावा असल्याचे स्पष्ट केले आहे.    

महायुतीने केलेल्या जाहिरातीतून तुमचा फोटो वगळण्यात आला. तुमच्या उमेदवाराला विरोध होतोय का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या, माझ्या उमेदवारीला प्रत्येकवेळी विरोध होतो. असे असले तरी प्रत्येकवेळेला मी माझेच रेकॉर्ड तोडलेले आहे. मला जाहिरातीच्या फोटोत इंटरेस्ट नाही. पंतप्रधान माझ्या मतदारसंघात येतात, त्यात मला इंटरेस्ट आहे. लाखो महिलांसमोर मोदी बोलणार आहेत. २०१४, २०१९ आणि आता २०२४मध्ये मोदी येत आहेत. ते ज्या ज्या वेळेला येथे आले तेव्हा शुभ संकेत मिळाले आहेत. हा महिलांसाठी महत्त्वाचा मेळावा आहे. तसेच, यवतमाळच्या रेल्वेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दौरा आहे. यवतमाळचा पायगुण चांगला आहे. २०१४ मध्ये ते ‘चाय पे चर्चा’साठी आले होते. त्यानंतर ते पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी रेल्वेची कामे मार्गी लावली. 

खासदार गवळी म्हणाल्या की, आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो, तेव्हा आम्हाला आश्वासित केलं होते की यापुढे तुम्हाला कायम ठेवणार. त्यामुळे माझी उमेदवारी दुसऱ्या कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही. या उमेदवारीवर माझाच दावा आहे. मी सलग पाचवेळा लोकसभेवर निवडून आले आहे. महाराष्ट्रातील मी पहिली महिला आहे की जी सतत निवडून येते. म्हणून मी म्हणते की, मै अपनी झांशी नहीं दुंगी. शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची मंगळवारी बैठक झाली. गेल्या निवडणुकीत २२ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार लढले होते. आता शिंदे गटातडे शिवसेना पक्ष, धनुष्यबाण हे चिन्ह आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा असायला पाहिजे, असेही गवळी यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest