महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक

राहुल नार्वेकरांच्या मेलवरून राज्यपालांना ई-मेल, नार्वेकरांनी दाखल केली मरिन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार

MaharashtraVidhanSabhaSpeaker'sMailHacked

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक

 

#मुंबई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई-मेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मेलवरून राज्याच्या राज्यपालांना मेल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार नार्वेकरांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

नार्वेकरांच्या हॅक झालेल्या मेलवरून राज्यपालांना मेल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काल (सोमवारी) नार्वेकरांचा मेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नार्वेकरांच्या मेलवरून जे आमदार सभागृहात नीट वागत नाहीत त्याच्यावर कारवाई करावी, असा मेल राज्यपालांना पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशन संपल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

दरम्यान, ही  बाब लक्षात येताच, राहुल नार्वेकरांनी मरिन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती आहे.

दरम्यान आपला मोबाईल नंबर बँक खाते, मेल, यूपीआय पेमेंटचे खाते, मोबाईल वॉलेट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांशी संलग्न आहे. यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा सुरक्षित राखणे आवश्यक झाले आहे.

हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपल्याबाबतीत असा प्रकार घडू नये आणि मोबाईल हॅक होऊ नये यासाठी चुका टाळा आणि निवडक सोपे उपाय करा. यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका कमी होण्यास मदत होईल. 

मोबाईलमधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी केबल वापरत असल्यास फक्त स्वतःची केबल वापरा. इतर कोणाचीही यूएसबी केबल वापरणे टाळा. ई-मेल अथवा मेसेजच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकविषयी खात्री नसल्यास त्या लिंकवर क्लिक करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा. 

स्वतःविषयी महत्त्वाची माहिती ऑनलाईन शेअर करणे टाळा. व्हाट्सॲप सारख्या चॅट अॅप्सवर मीडियाचे ऑटो डाउनलोडिंग बाय डीफॉल्ट बंद करा. डाऊनलोड केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाइलमधून आपल्या फोनमधील डेटा डिलिट केला जाऊ शकतो अथवा त्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे खात्री नसल्यास फाइल डाऊनलोड करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेली फाइल डाऊनलोड करणे टाळा. अनावश्यक असलेल्या आणि डुप्लीकेट झालेल्या फाइल डिलिट करा. यामुळे स्टोरेज कपॅसिटीचा व्यवस्थित वापर होईल आणि डेटा सुरक्षित राहील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest