महाराष्ट्र सदनला पाणीटंचाईचा फटका; मंत्र्यांचे प्रचंड हाल, पिण्याच्या पाण्याने आंघोळ करण्याची वेळ

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. देशात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Tue, 18 Jun 2024
  • 01:39 pm
Maharashtra Sadan

महाराष्ट्र सदनला पाणीटंचाईचा फटका; मंत्र्यांचे प्रचंड हाल, पिण्याच्या पाण्याने आंघोळ करण्याची वेळ

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. देशात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. असे असताना राजधानी दिल्लीतला एक अजबगजब प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र सदनात मंत्र्यांवर चक्क बाटलीबंद पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली आहे.  (Maharashtra Sadan)

महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यात आले आहे. या महाराष्ट्र सदनमध्ये देशभरातील नागरिक येत असतात. ते महाराष्ट्र सदनला भेट देत असतात. महाराष्ट्रातीलही अनेक मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गज नेते महाराष्ट्र सदनला दिल्लीत गेल्यावर आवर्जून भेट देतात. महाराष्ट्रातील दिग्गज नेते अनेकदा कामानिमित्त महाराष्ट्र सदनला गेले तर तिथे मुक्कामाला देखील राहतात. अतिशय महत्त्वाच्या अशा महाराष्ट्र सदनला दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका बसला आहे. महाराष्ट्र सदनला पाणीपुरवठा होत नसल्याने इथे असलेल्या मंत्र्यांना चक्क बाटलीबंद पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र सदनच्या नव्या इमारतीमधील शौचालयांमध्येदेखील पाण्याची व्यवस्था नाही. पाणी नसल्याने इथे अनेकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, आज बकरी ईद आहे. या बकरी ईदमुळे वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सदनला आलेल्या अतिथींची मोठी गैरसोय होत आहे. अनेकजण बाहेरून पाणी मागवत आहेत.

बांधकामावर पाण्यासारखा पैसा पण सदनात पाणीच नाही !
महाराष्ट्र सदनच्या बांधकामासाठी इतके पैसे खर्च करण्यात आले आहेत. असे असताना तिथे पाण्याचे नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सदनमध्ये सध्या अनेक व्हीआयपीदेखील आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनादेखील बाहेरून पाणी आणून दिल्याची माहिती मिळत आहे. पिण्याच्या पाण्याच्या मशिनमध्येदेखील काहीच पाणी नाही. देशभरातून आणि महाराष्ट्रातून अतिथी वेगवेगळ्या कामानिमित्ताने महाराष्ट्र सदनमध्ये येत असतात. न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार असे अनेक व्हीआयपी महाराष्ट्र सदनमध्ये येत असतात. त्यामुळे सदनाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित यावर लक्ष घालून पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी अतिथींकडून केली जात आहे. ही मागणी आता कधी पूर्ण केली जाते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest