Maharashtra: डॉ. नितीन करीर राज्याच्या मुख्य सचिवपदी

मुंबई: डॉ. नितीन करीर यांची काल (तारीख ३१ डिसेंबर) राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा

Dr. Nitin Karir, Chief Secretary of Maharashtra

Maharashtra: डॉ. नितीन करीर राज्याच्या मुख्य सचिवपदी

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्वीकारला पदभार

मुंबई: डॉ. नितीन करीर यांची काल (तारीख ३१ डिसेंबर) राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. 

डॉ. करीर यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर एमबीबीएस आहेत. १९८८ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहिले तर सांगली आणि पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. 

तसेच डॉ. करीर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिका आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही कार्यरत होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest