नाट्यगृहाची भाडेवाढ, वीजबिल रद्द!
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहाची भाडेवाढ, नाट्यगृहाचे वीज बिल आदी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसमोर वाभाडे काढण्यात आले. आशिया खंडात पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक भाडे असल्याची टीका होते. परिमाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ आयुक्त शेखर सिंह यांना भाडेवाढ कमी करण्याचे निर्देश दिले