वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही : बावनकुळे

आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही. विरोधक या घटनेवरून केवळ राजकारण करत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि. १२) केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 13 Jun 2023
  • 12:27 pm
वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही : बावनकुळे

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही : बावनकुळे

#नागपूर

आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही. विरोधक या घटनेवरून केवळ राजकारण करत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि. १२) केली.

बावनकुळे म्हणाले, ‘‘आळंदी येथे जे घडले, त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात पोलीस कुठेही वारकऱ्यांवर लाठीचार्ज करताना दिसत नाहीत. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये केवळ झटापट झाली आहे. स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काल माहिती दिली आहे. तरीही विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत.’’ विरोधकांनी या घटनेवरून राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकत्याच काही नव्या नियुक्त्या झाल्या आहेत. अनेकांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हे नवीन पदाधिकारी आता आपण काम करत आहोत हे दाखवण्यासाठी सरकारवर धारदार शब्दांत टीका करत आहे,’’ अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली. आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीचार्जची घटना घडताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्य सरकारचा निषेध केला. त्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांना हा टोला लगावला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest