लखुजी जाधवांच्या समाधी जीर्णोद्धारावेळी आढळले १३ व्या शतकातील शिवमंदिर

सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचा जीर्णोद्धार सुरु असताना १३ व्या शतकातील यादवकालीन पूर्व शिवमंदिर आढळून आले आहे. राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली आहे. सोळाव्या शतकातले राजे लखुजीराव जाधव यांच्यासह त्यांची तीन मुलं आणि नातवांच्या समाधी या ठिकाणी आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धनाचं काम करताना हे शिवमंदिर आढळून आलं आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 23 May 2024
  • 02:21 pm
Lakhujirao Jadhav

लखुजी जाधवांच्या समाधी जीर्णोद्धारावेळी आढळले १३ व्या शतकातील शिवमंदिर

बुलढाणा : सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव (Lakhujirao Jadhav)यांच्या समाधीचा जीर्णोद्धार सुरु असताना १३ व्या शतकातील यादवकालीन शिवमंदिर आढळून आले आहे. राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली आहे. सोळाव्या शतकातले राजे लखुजीराव जाधव यांच्यासह त्यांची तीन मुलं आणि नातवांच्या समाधी या ठिकाणी आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धनाचं काम करताना हे शिवमंदिर आढळून आलं आहे.

उत्खननात सापडलेल्या या पुरातन मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड असून हे मंदिर बांधताना मोठ-मोठ्या दगडांचा वापर केलेला आहे. हे मंदिर हेमाडपंथी बांधणी असून मंदिराखाली दगडी फरशीही बसवण्यात आल्याचं दिसून येते. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून, उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराबाबतचा सविस्तर तपशील समोर येऊ शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. उत्खननात मंदिराचे जे अवशेष मिळाले, त्यात शंकराच्या मंदिराचा गाभारा, सभामंडप असे भाग आढळले आहेत.

लखुजीराव जाधव यांच्या समाधीचा जिर्णोद्धार गेल्या वर्षी सुरु झाला होता. या ठिकाणी बराच माती, दगडांचा ढिगारा होता. तो काढत असताना आम्हाला हे मंदिराचे काही अवशेष आढळले. त्यातच हे मंदिर आढळले. या मंदिराचं दार, दाराच्या आतमधील शिळा या सगळ्यांवर यादवकालीन उल्लेख कोरलेले आहेत. त्यामुळे हे यादवकालीन मंदिर असावं. लखुजीराव जाधव यांची समाधी मंदिराच्या मागे आहे. मंदिराच्या सभा मंडपाच्या वर काही समाधी आढळल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की या समाधी येथे बांधण्याच्या आधीच्या काळातील हे मंदिर आहे.

समाधीस्थळाच्या ठिकाणी असलेले रामेश्वर मंदिर हे आधीपासून आहे. मंदिर आणि रामेश्वर मंदिर एकाच काळातले असावं. घटनास्थळी आणखी काय काय पुरावे आढळतात, त्यावर या मंदिराचा काळ कुठला ते निश्चितपणे सांगता येईल. हे मंदिर तेराव्या शतकातले असावं असा अंदाज आहे. अशी माहिती पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest