मुंबई : गलिच्छ राजकारणामुळे पोलिसांपुढे शरणागती, शिल्पकार आरोपी जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी यांची माहिती

मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे याने या प्रकरणातील घाणेरड्या राजकारणाचा तिटकारा आल्यामुळे आपण शरणागती पत्करल्याचे म्हटले आहे. मालवण न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याचे वकील गणेश सोवनी यांनी ही माहिती दिली.

File Photo

मुंबई : मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे याने या प्रकरणातील  घाणेरड्या राजकारणाचा तिटकारा आल्यामुळे आपण शरणागती पत्करल्याचे म्हटले आहे. मालवण न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याचे वकील गणेश सोवनी यांनी ही माहिती दिली. 

पुतळा कोसळल्याप्रकरणी तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील आणि जयदीप आपटे दोघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. आपटेचे वकील गणेश सोवनी म्हणाले की, जयदीप आपटे यांच्या विरोधात केलेले आरोप चुकीचे आहेत. आपटेने त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि त्यानंतर शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मात्र त्याला गुप्त माहितीच्या आधारे अटक केल्याचे सांगितले आहे.

तांत्रिक सल्लागार चेतन पाटील याने मागच्या आठवड्यात कोल्हापूर येथे शरणागती पत्करली होती. कंत्राट मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण करण्यासाठी किती दिवसांचा कालावधी दिला होता, त्यानंतर किती वेळात बांधकाम पूर्ण केले, काम लवकर पूर्ण करण्यासाठी कुणाचा दबाव होता का आणि या कंत्राटाचे अर्थकारण काय? याबाबतचे प्रश्न चेतन पाटील याला विचारण्यात येणार आहेत.

तत्पूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चेतन पाटील म्हणाला की, मी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चबुतऱ्याचे डिझाईन दिले होते. मला चुबतऱ्यावर ११ टन वजन असेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मी त्याचे डिझाईन बनवले होते. माझा मुख्य पुतळ्याशी संबंध नाही. त्या पुतळ्याचे काम ठाण्यातल्या एका कंपनीला दिले होते.

दरम्यान, हा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आली आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करणे हे समितीचे मुख्य काम असणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest