फडणवीसांचा उल्लेख करून जरांगे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टिका करताना आई-बहिणीचा उल्लेख केला होता. त्याबद्दल आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Manoj Jarange Patil

संग्रहित छायाचित्र

आई-बहिणीचा उल्लेख अनावधानाने झाला असल्याचे सांगितले

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टिका करताना आई-बहिणीचा उल्लेख केला होता. त्याबद्दल आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून ते शब्द अनावधानाने वापरले गेले असे म्हणून त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल फडणविसांची माफी मागितली आहे.  

छत्रपतींचे विचार सोडले का? असा प्रश्न फडणविसांनी जरांगे पाटील यांना केला होता. यावर माझ्या तोंडून आई-बहिणीचा उल्लेख झाला असेल तर ते मी मागे घेतो आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आई-बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा नाही. मीदेखील छत्रपतींचे विचार मानतो असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation News)

तसेच, जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी एसआयटी चौकशीचं स्वागत केले आहे. पण, ही चौकशी एकतर्फी न होता सर्व नेत्यांची देखील करावी असे त्यांनी पुढे म्हटले आहे.मी खरा असेल तर ज्यांनी एसआयटी चौकशी लावली त्यांना जेलमध्ये टाकावं लागेल. मी पळपुटा नाही, एसआयटी चौकशीसमोर मी सगळं सांगतो, असं मनोज जरांगे म्हणालेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest