शिंदे एलॉन मस्कचे वडील आहेत का?

शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर (Rabindra Waikar)यांच्या विजयामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. तसेच ईव्हीएम मशिन हॅक होत नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, हे शिंदे कोण आहेत? ते एलॉन मस्कचे वडील आहेत का?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Tue, 18 Jun 2024
  • 01:31 pm
Eknath shinde

शिंदे एलॉन मस्कचे वडील आहेत का?

वायकर विजयावरील मुख्यमंत्र्यांच्या खुलाशावर संजय राऊत यांचा सवाल

शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर (Rabindra Waikar)यांच्या विजयामध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. तसेच ईव्हीएम मशिन हॅक होत नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, हे शिंदे कोण आहेत? ते एलॉन मस्कचे वडील आहेत का? राऊत म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत आम्ही आरोप केले नाहीत. ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकतं असा दावा उद्योगपती एलॉन मस्क यांनी केला आहे. आम्ही केवळ उत्तर पश्चिम मतदारसंघातील घोटाळ्यावर बोलत आहोत. तेथील वादग्रस्त घटनांच्या पार्श्वभूमीवर वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं.

शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना अवघ्या ४८ मतांनी पराभूत केले. त्याचे कवित्व आता रंगात आले असून निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. या प्रश्नी ठाकरे गटाचे नेते सातत्याने निवडणूक अधिकारी, मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करत आहेत. सोमवारी संजय राऊत म्हणाले, वायकरांचा विजय देशभरातील सर्व निकाल प्रक्रियेतील एक आदर्श घोटाळा आहे. भाजपा आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी काही मतदारसंघांमध्ये चुकीच्या मार्गाने विजय मिळवला आहे. 
राऊत म्हणाले, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना अधिकाऱ्यांनी दोन वेळा विजयी घोषित केलं. त्यानंतर निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांना एक फोन येतो… त्यापाठोपाठ दुसरा एक निवडणूक अधिकारी फोन घेऊन मतमोजणी चालू आहे तिथे जातो… त्या फोनवर ओटीपी येतो किंवा फोनद्वारे ईव्हीएम मशिन अनलॉक होतं, अथवा त्याच्याशी काहीतरी छेडछाड करता येते… रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मतमोजणीच्या ठिकाणी तो फोन घेऊन फिरत होता… हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यावर वंदना सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला नाही. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर वायकरांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्यांचा फोन जप्त करण्यात आला. वनराई पोलिसांनी तो फोन जप्त केला. मात्र, तो फोन पोलिसांकडून परत मिळवण्याचा गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालू आहे. वायकरांचा जवळचा माणूस, एक निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्याने वनराई पोलीस ठाण्यात येरझाऱ्या मारत आहे.

राऊत म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत आम्ही आरोप केले नाहीत. ईव्हीएम मशिन हॅक होऊ शकतं असा दावा उद्योगपती एलॉन मस्क यांनी केला आहे. आम्ही केवळ उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या घोटाळ्यावर बोलत आहोत. आधी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केलं. त्यानंतर पोस्टल बॅलेटची मतं बेकायदेशीरपणे मोजून वायकर यांना विजयी केलं. त्यामुळे आता आमची मागणी आहे की रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं. राऊत म्हणाले, देशभर असे ४० ते ४५ मतदारसंघ आहेत, जिथे एनडीएचा उमेदवार १०० ते १००० मतांनी जिंकला आहे. ते निकाल भाजपावाल्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर ते भाजपाच्या बाजूने वळवले. उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ हे त्यातलं एक आदर्श उदाहरण आहे.

कोर्टात लढाई होणार
कीर्तिकरांच्या निकालावर कोर्टाची लढाई सुरू होणार आहे, असे सांगून ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले, ही जागा आम्ही जिंकली आहे. हुकूमशाहीच्या विरोधात मुंबईकरांनी जो निकाल दिलाय तो जगजाहीर आहे. यात जी गडबड झाली आहे, त्यातल्या टेक्निकल गोष्टी आम्ही मांडू इच्छितो. निवडणूक आयोग एका पक्षाच्या सांगण्यावरून काम करत आहे. सगळी गडबड करूनही इंडिया आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. ही गडबड झाली नसती तर सरकार बदलले असते. अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. हा पराभव संशयास्पद आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest