खालापूरमधील अख्या गावावरच दरड कोसळली, चौघांचा मृत्यू, ५० हून अधिक लोक अडकली
राज्यभरासह कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये ५० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
या गावात ५० ते ६० घरांची वस्ती असून जवळपास २०० ते ३०० मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे ३० ते ४० घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे.
रायगड जिल्ह्यामधील इर्शाळवाडी वसाहत येथे ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. मात्र, यात ४ जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे.