HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 2.12 टक्क्याने वाढ झालेली आहे.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 2.12 टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. 

बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला होता. यंदा त्या तुलनेत चार दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते.

मुलींचा निकाल - 95.44 टक्के 

मुलांचा निकाल - 91.60 टक्के 

मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.84 टक्के ने अधिक आहे.

राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के आहे.

विभागनिहाय निकाल

पुणे - 94.44 टक्के 

नागपुर -92.12 टक्के 

संभाजीनगर - 94.08 टक्के 

मुंबई - 91.95 टक्के 

कोल्हापूर -94.24 टक्के 

अमरावती -93 टक्के 

नाशिक -94.71 टक्के 

लातूर - 92.36 टक्के 

कोकण -97.51 टक्के 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest