‘आरे’तील वृक्षतोड : सर्वोच्च न्यायालयालाही गुंडाळले
मुंबईस्थित आरे जंगलातील मेट्रो-३च्या कारशेडसाठी अतिरिक्त ८४ झाडे तोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. असे असतानाही महापालिका आयुक्तांनी
१७७ झाडे तोडण्याची परवानगी दिली. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची तातडीने दखल घेत उच्च न्यायालयाने शुक्रवारी
(दि. ३१) या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे.