संग्रहित छायाचित्र
मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसकडून सिद्धी कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम यांची उमेदवारी जाहीर करत शरद पवारांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
त्यामुळे आता मोहोळ मतदारसंघातून निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसते. कारण रमेश कदम हे माजी मंत्री असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा सदस्यत्वासह मंत्रीपदही भूषवले होते. त्यामुळे या मतदारसंघाची रमेश कदम यांना संपूर्ण माहिती आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसते. कारण विद्यमान आमदार यशवंत माने यांनी आपल्या काळात संपूर्ण मोहोळ तालुक्याला कुठे निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे त्यांचहाही
या मतदारसंघात लोकसंग्रह जास्त आहे व यावेळेस त्यांच्यासोबत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक यशवंत माने यांना सहज जिंकता येईल, अशी चिन्हे आहेत. कारण माजी मंत्री रमेश कदम हे ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे माजी आमदार राजन पाटील व त्यांची चिरंजीव होते यावेळी ते यशवंत माने यांच्या मागे उभे आहेत. त्यामुळे निवडणुक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
मोहोळ या मतदारसंघात प्रथमच एखाद्या पक्षाने महिला उमेदवाराळ संधी दिली आहे. माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी मोहोळमध्ये त्यांना किंवा त्यांचे चिरंजीव अभिजीत यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना संधी मिळेल असे वाटत होते. पण शरद पवार यांनी सिद्धी कदम यांचे नवा जाहीर केल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली. या मतदारसंघात राजू खरे, संजय क्षीरसागर, अभिजीत ढोबळे, पवन गायकवाड, रॉकी बंगाळे इच्छुक होते. या सर्वांना डावलून कदम यांना संधी मिळाली आहे.