Solapur : येत्या काळात अजित पवार हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 29 Oct 2024
  • 01:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांचा विश्वास, मुख्यमंत्री नमूद असलेला नामफलक देऊन अजित पवारांचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापुरातील 'इच्छा भगवंताची' परिवाराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बारामती येथील सहयोग बंगला येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने गुलाबी शाल, मखमली टोपी, पुष्पगुच्छ आणि मुख्यमंत्री माननीय नामदार अजित आशाताई अनंतराव पवार असे नमूद असलेले नामफलक देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपणच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, असे म्हणत प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  तसेच यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, किरण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर संघटक माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, महादेव राठोड ऋषभ प्याटी यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. 

दरम्यान यावेळी सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि ग्रामीण मोहोळ येथील विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करावे यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आपण येणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest