संग्रहित छायाचित्र
दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाने तब्बल ३३७ गाड्या जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून (२५ ऑक्टोबर) त्या मार्गावर धावण्यास सुरुवात झाली आहे. पुणे मार्गावर सर्वाधिक गाड्या धावणार असून सर्व गाड्यांना प्रवाशांच्या प्रतिसाद मोठा असल्याचे महामंडलाकडून सांगण्यात आले आहे.
दिवाळीत गावाकडे परतणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी असते शिवाय धार्मिक व पर्यटन सहलीवरील जाणारे संख्या अधिक असतात. अशावेळी सर्वांची सोय व्हावी यासाठी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर-लातूर मार्गावर सकाळी सात वाजल्यापासून पुणे मार्गावर सकाळी आठ वाजल्यापासून जागा गाड्या धावत आहेत. त्याचबरोबर पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, अकलूज, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला, करमाळा याही आगारातून सर्वाधिक गाड्या पुणे-मुंबई मार्गावरच धावत आहेत. शिवाय अहिल्यानगर, लातूर, परळी, बीड, गाणगापूर या मार्गावरही गाड्या धावत आहेत.