संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची दृष्टीने आधार कार्ड प्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमीक रजिस्ट्री) नंबर तयार करण्याच्या सूचना शिक्षण विभाग प्रशासनाने दिले आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी. तसेच पाहिजे तेव्हा ती ऑनलाईन स्वरूपात बघता यावी यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी वन नेशन वन स्टुडन्ट आयडीच्या धरतीवर आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीपासून अपार नंबर तयार करण्यात येणार आहेत. यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. हा नंबर डीजी लॉकरलाही जोडण्यात येणार आहे. पुढील महिन्यात यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.