राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचे नाना पटोलेंकडून समर्थन; उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी रणनीती आखली होती. मात्र भाजपा 400 पेक्षा जास्त जागांवर निवडून आल्यास संविधान बदलण्यात येईल आणि आरक्षण हटविण्यात येईल असा नारा काँग्रेसने दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 28 Oct 2024
  • 01:11 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections 2024) भाजपने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी रणनीती आखली होती. मात्र भाजपा 400 पेक्षा जास्त जागांवर निवडून आल्यास संविधान बदलण्यात येईल आणि आरक्षण हटविण्यात येईल असा नारा  काँग्रेसने दिला. या रणनीतीचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला आणि काँग्रेसला भरभरून मतदान झाले. मात्र काँग्रेसचा घोडा 99 जागांवर अडला. भारतीय जनता पक्ष 240 जागा घेऊन केंद्रात पुन्हा सत्ताधारी झाला.

निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा विदेश दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्याचा मानस आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याबद्दल माध्यमांमध्ये जास्त चर्चा झाली नाही. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी देखील त्याच्यावर थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली नाही.

अशातच झारखंड आणि महाराष्ट्र (Maharashtra Assembly Election 2024) या दोन राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांतही मतदानाचा कल राहील अशी अटकळ बांधून अल्पसंख्याक समाजाच्या मतदानाला आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीने नुकतीच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत नाना पटोले यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणा बद्दलच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. आरक्षण (Reservation) संपुष्टात आणणार हे राहुल गांधी यांचे विधान काहीही चुकीचे नाही. त्यात वावगे काहीही नाही असे विधान नाना पटोले यांनी केले. देशात लागू असलेले आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा स्पष्ट इरादा असल्याचे नाना पटोले यांनीही स्पष्ट केले आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दलित समाजात संभ्रम निर्माण झाला  आहे.  संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांना आरक्षण दिले. ते आरक्षण काढून घेण्याचा किंवा तशी भूमिका घेण्याचा अधिकार काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना कोणी दिला, असा असावा आता भाजपच्या नेत्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. काँग्रेसची भूमिका बहुजन विरोधी आणि आरक्षण विरोधी  असल्याची टीका भाजपा तसेच महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येऊ लागली आहे. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुली एससी-एसटी, ओबीसी या समाजात संतापाची भावना निर्माण झाली झाल्याचं दिसून येत आहे. 

दुसरीकडे, भाजपने (BJP) विक्रमी बहुमत असतानाही बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण कायम ठेवले. त्यावर कडी म्हणजे नॉन क्रिमी लेयर ची मर्यादाही भाजपने उठवली. वंचित वर्गाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी घेतली आहे.  तसेच, भाजपा नेत्यांकडून काँग्रेस पक्ष आणि नेतेमंडळींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले. राहुल गांधी यांची भूमिका पाहता आणि नाना पटोले यांनी त्या भूमिकेला दिलेले समर्थन लक्षात घेता काँग्रेस चुकून सत्तेत आली तर एससी एसटी ओबीसी अशा सर्व समाजांचे आरक्षण रद्द केल्याशिवाय राहणार नाही अशी भाजपा नेतेमंडळींसोबतच सर्वसामन्य जनतेची भावना झाली आहे.

तसेच , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस (Congress) पक्षाने दोन वेळा पराभूत केले. त्यांना अपमानास्पदरित्या राजीनामा देण्यासाठी भाग पाडल्याची टीका काँग्रेस पक्षावर केली जाते . तसेच, भारतातील स्त्रोतांवर मुस्लिम समाजाचा पहिला अधिकार आहे असे विधान काँग्रेसच्या एका सर्वोच्च नेत्याने केले होते.  तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतातील साधन संपत्तीचे समान वितरण करायला हवे,असे विधान काँग्रेसचे विदेशातील नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते. यावरून देखील  काँग्रेसला खूप वेळा धारेवर धरले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest