कारखानदारांनो, माझ्या नादाला लागायचे काम नाही; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांना तंबी, म्हणाले...

शिराळा-वाळव्यातील कारखानदारांनो, विनाकारण माझ्या वाटेला जाऊ नका, चार जूनला गुलाल मलाच लागणार आहे, आता तुम्ही रिकामे आहात, सहा महिन्यांनंतर मी रिकामा असणार आहे, माझ्या कामात अडथळे आणल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी काय करतो ते पाहा

Raju Shetty

कारखानदारांनो, माझ्या नादाला लागायचे काम नाही; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांना तंबी, म्हणाले...

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना मीच जाब विचारू शकतो

कोल्हापूर : शिराळा-वाळव्यातील कारखानदारांनो, विनाकारण माझ्या वाटेला जाऊ नका, चार जूनला गुलाल मलाच लागणार आहे, आता तुम्ही रिकामे आहात, सहा महिन्यांनंतर मी रिकामा असणार आहे, माझ्या कामात अडथळे आणल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी काय करतो ते पाहा,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी (Raju Shetty)  यांनी दिला आहे.

मांगले येथे प्रचारसभा झाली, त्या वेळी ते बोलत होत. शेट्टी म्हणाले, ‘‘शिराळा तालुक्यातील नागरिकांवर मोठी दडपशाही सुरू आहे. लोक जवळ यायला तयार नाहीत. भेटायला गेलो तर मागच्या दाराने बाहेर काढत आहेत. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना केवळ मीच जाब विचारू शकतो. कारण माझ्या मिशीला कुठेही खरकटे लागलेले नाही. राजू शेट्टी म्हणाले, आंबेडकरांनाही अभिमान वाटेल असे मी काम केले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत माझा हात स्वच्छ असणार आहे. 

गेली वीस वर्षे वर्गणी काढून निवडणूक लढवत आहे. सत्ता आल्यानंतर आणि खुर्चीवर बसल्यानंतर माणूस बदलतो, याचा अनुभव उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आला. एकरकमी एफआरपीची मागणी करीत होतो, मात्र कारखानदारांचे ऐकून एफआरपीचे तुकडे केले. शेतकऱ्यांवर दूरगामी परिणाम करणारे कायदे मंजूर करण्यात माझा मोठा वाटा आहे.शेट्टी यांनी आमदार जयंत पाटील, मानसिंगराव नाईक यांच्यासह उमेदवार धैर्यशील माने, सत्यजित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय जगताप, कैलास पाटील, प्रहार संघटनेचे बंटी नांगरे, पोपटराव मोरे, रवींद्र मोरे, सर्जेराव कोकाटे, संजय चरापले, राजाराम खोत, दिग्विजय पाटील, मानसिंग पाटील ,सूर्यभान जाधव, कैलास देसाई, गजानन पाटील, मोहनराव पाटील आदी उपस्थित होते.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest