सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नोटिसा !

बारामती लोकसभा (Baramati Loksabh Election 2024) मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे.

Baramati Loksabh Election 2024

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नोटिसा !

खर्च कमी दाखवला : दोन दिवसांत मागितला खुलासा; उत्तर न दिल्यास तफावत मान्य असे समजणार

पुणे : बारामती लोकसभा (Baramati Loksabh Election 2024)  मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे. नोटिशीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. खुलासा अयोग्य असल्यास प्रशासनाला समितीकडे जाण्याचा अधिकार असल्याचे द्विवेदी म्हणाल्या. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी (दि. १) झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये इतका आहे. उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शेंडो रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळली. यामुळे पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ती उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. उमेदवारांची पहिली खर्च तपासणी २५ एप्रिलला झाली. त्यात ३८ पैकी ४ उमेदवारांनी खर्च सादर केला नव्हता. जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे उमेदवारांना दाद मागता येणार आहे, असे कविता द्विवेदी म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा २८ एप्रिलपर्यंत एकूण खर्च ३७ लाख २३ हजार ६१० इतका झाला आहे. खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शेंडो रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळली. ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. याबाबतचा खुलासा पुढील ४८ तासांत देण्याचे सांगण्यात आले आहे. खुलासा न आल्यास तफावत मान्य असल्याचे समजून ती उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest