एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील अंतिम निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यात अपात्र असलेल्या १६ आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करण्यात नकार दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्त पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टाने म्हटले की, भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर आहे, तसेच पक्षाने बजावलेला व्हिप अनाधिकृत आहे, अधिकृत व्हिप कोणता आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्षांनी तो जाणून घ्यायला हवा होता, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल पत्रावरुन राज्यपालांनी कारवाई सुरु करणे चुकचे होते, पक्षांतर्गत वादाकडं राज्यापलांनी पाहण्याचा अधिकार नाही. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय देणं बेकायदेशीर होतं. पण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे, राज्यपालांनी प्रश्न सोडवला असे म्हणता येणार नाही. राज्यपालांचे अधिकार वेगळे आहेत. राज्यपालांचा बहुमत चाचणी बोलावण्याचा निर्णय वैध नाही. तो संविधानिक नाही, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.