ईडीच्या कारवाईने सांगलीत खळबळ

राज्यावर सध्या ईडीची वक्रदृष्टी असून या केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरू आहे. सांगलीमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी ईडीची दोन पथकं आणि १० अधिकारी यांच्यासोबत सीआरएफचे जवान दाखल झाले. त्यांनी सांगलीतील बडे व्यावसायिक पारेख बंधू यांच्या घरावर धाड टाकली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:54 am
ईडीच्या कारवाईने सांगलीत खळबळ

ईडीच्या कारवाईने सांगलीत खळबळ

#सांगली

राज्यावर सध्या ईडीची वक्रदृष्टी असून या केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरू आहे. सांगलीमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी ईडीची दोन पथकं आणि १० अधिकारी यांच्यासोबत सीआरएफचे जवान दाखल झाले. त्यांनी सांगलीतील बडे व्यावसायिक पारेख बंधू यांच्या घरावर धाड टाकली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यातील कारवाईत व्यग्र असलेल्या ईडीने आपला मोर्चा सांगलीकडे वळवला आहे.  सांगलीतील पारेख बंधू यांच्या घरावर ईडीने शुक्रवारी सकाळी धाड टाकली. शिवाजीनगर येथील पारेख बंधूंच्या दोन बंगल्यांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात आहेत.

सध्या ईडीकडून राज्यात छापेमारीची कारवाई सुरू आहे. मागच्या तीन दिवसात मुंबईतील नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांना ईडीच्या कारवाईने चिंतेत टाकले आहे. त्यात ईडीने ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घरावर तसेच कार्यालयावर छापेमारीची कारवाई केली.

आता ईडीने आपला मोर्चा सांगलीकडे वळवला आहे. सांगलीमध्ये शुक्रवारी सकाळी ईडीची पथके दाखल झाली. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे सांगलीत एकच खळबळ उडालेली आहे. सुरेश पारेख आणि दिनेश पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. व्हॅल्यू ॲडेड कर (व्हॅट) चुकवल्याप्रकरणी त्यांच्यावर ईडीची छापेमारीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या झोन क्रमांक दोनकडून ही कारवाई सुरू आहे.  

ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास मात्र नकार दिला आहे.  पारेख बंधू हे मोठे उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पारेख कुटुंबातील गाड्यांची तपासणी केली. सांगलीमध्ये गणपती पेठ येथे सुरेश लाईट हाऊस नावाचे इलेक्ट्रिकल्सचे मोठे दुकान आहे. व्यवसायात आणि आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याच्या संशयावरून ईडीचे पथक दोन्ही बंगल्यातील कागदपत्रांची तपासणी करत आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest