मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के, अजित पवारांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम या जिल्ह्यांत आणि विदर्भातील काही भागांत बुधवारी सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदवण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Wed, 10 Jul 2024
  • 05:03 pm
Marathawada, Vidarbha, Earthquake, Ajit Pawar

मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के, अजित पवारांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम या जिल्ह्यांत आणि विदर्भातील काही भागांत बुधवारी सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदवण्यात आली. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ होता. भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत. सरकारने गंभीरपणे या घटनेची नोंद घेतली आहे. संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी घेण्यात येत आहे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest