संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव
#मुंबई
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मंगळवारी (दि. १६) हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.
संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन जनमानसात विधानसभा अध्यक्षांची पर्यायाने विधिमंडळाची प्रतिमा खराब केल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. आमदार अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आरोपाच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे.
संजय शिरसाट यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, ‘‘गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसेनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून, आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करीत आहेत.’’
भारतीय संविधानाने विधानसभा अध्यक्ष यांना व्यापक, नियमनात्मक, प्रशासकीय आणि न्यायिक अधिकार दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही. इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी दाखल केल्या प्रस्तावात केला आहे.
विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाच्या कार्यप्रणालीत कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करीत नाहीत किंवा त्यांना कोणत्याही पक्षाची झालर लागलेली नसते, तर ते सर्वच पक्षांचे विधिमंडळातील पीठासन अधिकारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर खोटे, बेफाम आरोप करून जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याबरोबरच विधिमंडळाचे पावित्र्य धोक्यात आणण्याचे काम राऊत हे करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष या नात्याने
आपल्यावर संजय राऊत यांच्याकडून होणारे आरोप, या पदाची च्याकडून केली जाणारी मानहानी, अपमान या सर्व गोष्टींचा विचार करता संजय राऊत यांच्याविरुद्ध विधानसभेत कभंग दाखल करण्यात यावा, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.