महाड अग्वितांडवातील ९ जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबीयांना ४५ लाखाची मदत मिळणार
महाडमधील (Mahad) कंपनी स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या गेटवर (Dead bodies) कुटुबियांनी आक्रोश केला आहे. काल ७ तर आज शोधकार्य सुरू असताना २ अशा एकूण ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना ४५ लाखापर्यंत मदत मिळवून (Blue Jet Healthcare company fire) देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याबाबत आमदार भरत गोगावले यांनी माहिती दिली आहे.
महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती. या कंपनीत आधी स्फोट होऊन आग लागली, त्यामुळे 11 कामगार अडकले होते. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे कामगार कंपनीत अडकले होते, त्यापैकी 9 जणांचे मृतदेह हाती आले आहेत.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि विमा कंपनीच्या माध्यमातून ९ ते १८ लाख, अशी एकूण ४५ लाखांपर्यत मदत मिळवून देऊ, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.