वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांचे प्रोबेशन ट्रेनिंग रद्द: मसुरी अकादमीत परत बोलावले

कोट्यवधींची संपत्ती असतानादेखील ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट आणि बहुविकलांगता प्रमाणपत्र जोडत यूपीएससीमध्ये आयएएस पद मिळविणाऱ्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या प्रकरणाची लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने गंभीर दखल घेतली आहे.

लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने वाशिम जिल्हा साहाय्यक जिल्हाधिकारी खेडकर यांना पुन्हा मसुरीला परत बोलावले

कोट्यवधींची संपत्ती असतानादेखील ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट आणि बहुविकलांगता प्रमाणपत्र जोडत यूपीएससीमध्ये आयएएस पद मिळविणाऱ्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या प्रकरणाची लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने गंभीर दखल घेतली आहे. त्यांचे वाशिम जिल्ह्यातील साहाय्यक जिल्हाधिकारी पदावर सुरू असलेले प्रोबेशन ट्रेनिंग रद्द करत त्यांना मसुरीत तातडीने बोलावण्यात आले आहे.  

बनावट नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट आणि बहुविकलांगता प्रमाणपत्र जोडून  दिव्यांग कोट्यातून आयएएस बनल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर होत आहे. त्याची दखल घेत खेडकर यांना तातडीने मसुरी येथील ॲकॅडमीत २३ जुलैपूर्वी रिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनचे उपसंचालक शैलेश नवल यांनी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना तातडीचे लेखी आदेश दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात साहाय्यक जिल्हाधिकारी पदावर प्रशिक्षण करणाऱ्या पूजा खेडकर यांना तातडीचे पत्र देत प्रोबेशन ट्रेनिंग थांबविण्याचे सूचित केले. तसेच तातडीने २३ जुलैपूर्वी अॅकेडेमीत  रिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमिलेयर दाखल्याची चौकशी करून तसा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यासाठी आयकर विभागाने खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची आणि त्यांच्या आई-वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागवण्यात आली आहे. नगर जिल्हा प्रशासनानेही ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागानेही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी आवश्यक असलेली माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या उत्पन्नाचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, आपली पोलिसांकडून चौकशी होऊ शकते, हे लक्षात येताच पूजा खेडकर यांचे आई-वडील गायब झाले आहेत. पूजा खेडकर यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे. या संपत्तीतून त्यांना उत्पन्नही मिळते. आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या आयटी रिटर्नमधून या माहितीचा खुलासा झाला आहे.

दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्राची होणार पोलीस चौकशी
पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे. पूजा यांचे १५ ते १९ जुलै या कालावधीत अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या इंटर्न म्हणून प्रशिक्षण सुरू होते. यानंतर त्या  जिल्हा साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार होत्या. मात्र, वाशिमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी याला स्थगिती दिली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होण्यासाठी पूजावर अपंगत्व (बहुविकलांगता) आणि ओबीसी आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजाच्या दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्राची पोलीस चौकशी होणार आहे. प्रमाणपत्र देणाऱ्या तहसीलदारांसह डॉक्टरांचीही चौकशी केली जाईल. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय तपासणी, कागदपत्रांची काटेकोर तपासणी तसेच अन्य सखोल चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest