Ladki Bahin of the state will also see their dream of owning a home come true
महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारमुळं आता राज्यातील लाडक्या बहिणींच घराचं स्वप्नदेखील पुर्ण होणार आहे. गेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुतीने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना स्वतःच हक्काच घरं मिळणार आहे.
भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा चौहान यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या या घोषणेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री चौहान यांचे आभार मानले.
आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंतप्रधान आवास योजनेबद्दल मोठी माहिती दिली.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार आहेत. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली ही सर्वाधिक घरे आहेत असं मोठ विधान मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी केले.
या योजनेचा लाभ आता या लोकांनादेखील घेता येणार
चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी, मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, लँडलाईन फोन आणि फ्रीज असेल त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ही अट 10 हजार रुपये उत्पन्न एवढी होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.