संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा १८ जुलै २०२३ रोजी पासून सुरू होणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा जुलै ते ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजिक करण्यात आल्या आहेत.
यामध्ये दहावी १० वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवारी म्हणजेच १८ जुलै ते ते ०१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. तर इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार म्हणजेच १८ जुलै ते ०५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहेत.
दरम्यान, मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.