Manoj Jarange : मोठी बातमी : भरसभेत मनोज जरांगे यांना भोवळ; साताऱ्यातील सभेत तब्बेत खालावली

सातारा : मराठा समाजास ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना भरसभेत भोवळ आल्याची बातमी समोर आली.

Manoj Jarange

Manoj Jarange : मोठी बातमी : भरसभेत मनोज जरांगे यांना भोवळ; साताऱ्यातील सभेत तब्बेत खालावली

सातारा : मराठा समाजास ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना भरसभेत भोवळ आल्याची बातमी समोर आली. साताऱ्यात भाषण करत असताना चक्कर आल्यामुळे भाषण करतानाच खाली बसले. मराठा समाजात जनजागृती व्हावी, शांतता निर्माण व्हावी यासाठी ७ ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरु आहे. त्यादरम्यान जरांगे यांची तब्बेत अचानक खालावली आहे. 

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आग तिसरा दिवस असून साताऱ्यात ही रॅली दाखल झाली आहे. दरम्यान साताऱ्यातील शांतता रॅलीच्या सभेत भाषण करताना जरांगे यांची तब्बेत अचानक खालावली. भाषण करताना त्यांना भोवळ आल्यामुळे ते खाली बसले. 

शांतता रॅली उद्या पुण्यात

जरांगे पाटील रविवारी सातारा दौरा संपवून सकाळी अकरा वाजता स्वारगेटजवळील सारसबाग येथे येणार आहेत. सारसबाग येथून मराठा बांधवांसह सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागृती, शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे.ही रॅली सारसबाग, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छ.शिवाजीमहाराज पूल, छ.शिवाजीमहाराज स्मारक मार्गे जंगली महाराज रोड,बालगंधर्व चौक येथून छ.संभाजी महाराज पुतळा डेक्कन मार्गे रॅली अलका टॉकीज चौकात येणार आहे.या ठिकाणी जाहीर सभा होणार असून मनोज जरांगे पाटील उपस्थितांना संबोधित करणार आहेत. याच ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे.या रॅलीत पिंपरी चिंचवड शहरातील मराठा बांधव सहकुटुंब सहभागी होणार आहेत. यासाठी शहरातील भक्ती शक्ती समूहशिल्प चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छ.शिवाजी महाराज पुतळा डांगे चौक,भोसरी पी.एम.टी.चौक, कासारवाडी चौकातून सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा बांधव चारचाकी व दुचाकीवरून पुण्याकडे रवाना होणार आहेत.

काळेवाडी,थेरगाव, वाकड,रहाटणी परिसरातील हजारो बांधव डांगे चौक थेरगाव येथील छ.शिवाजीमहाराज पुतळ्यास अभिवादन करून सकाळी दहा वाजता औंध मार्गे  पुण्याकडे दुचाकी रॅलीने रवाना होणार आहेत.थेरगाव चिंचवड विभागाचे नियोजन सकल मराठा समाजाचे समन्वयक सतीश काळे, प्रकाश जाधव, वैभव जाधव,नकुल भोईर, वाल्मिक माने,सर्जेराव पाटील, लहू लांडगे,सचिन बारणे, रावसाहेब गंगाधरे,रमेश कदम यासाठी समन्वय साधत आहेत. शहरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest