MPSC: राज्यसेवा आयोगाची २७४ पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध

पुणे: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण २७४ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगा

संग्रहित छायाचित्र

विविध विभागांतर्गत भरली जाणार गट अ आणि ब अधिकाऱ्यांची पदे

पुणे: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (MPSC 2024) साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्र  शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण २७४ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २८ एप्रिल २०२४ महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावर परीक्षा घेणार आहे. 

या परीक्षेअंतर्गत सामान्य प्रशासन विभागाच्या राज्य सेवेतील २०५ पदे, मृद व जलसंधारण विभागाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेची २६ पदे तर महसूल व वन विभागाच्या महाराष्ट्र वन सेवेतील ४३ पदे भरली जाणार आहेत. या परिक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी ५ जानेवारी २०२४ ते २५ जानेवारी २०२४ असा असणार आहे. परीक्षा शुल्क अमागास वर्गाकरीता ५४४ रुपये इतके असेल तर मागासवर्गीय/अनाथ/  दिव्यांग यांसाठी ३४४ रुपये असेल. 


सदर जाहिरातीत मुख्य परीक्षेच्या तारखाही जाहिर करण्यात आल्या आहेत. 

राज्य सेवा मुख्य परीक्षा - १४ ते १६ डिसेंबर २०२४ 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २३ नोव्हेंबर २०२४

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा - २८ ते ३१ डिसेंबर २०२४

 

राज्य सेवेअंतर्गत भरली जाणारी पदे  (२०५ पदे)

उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी - २७पदे 

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा - ४० पदे 

सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी( PO)-३ पदे

उद्योग उपसंचालक- ७ पदे 

सहायक कामगार आयुक्त- २ पदे 

मंत्रालयीन कक्ष अधिकारी- १९ पदे

सहायक गट विकास अधिकारी - २१ पदे

सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (गट ब )- १ पद  

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता - मार्गदर्शन अधिकारी - ३ पदे 

सरकारी कामगार अधिकारी  - २ पदे 

सहायक प्रकल्प अधिकारी- ४ पदे

निरीक्षण अधिकारी (पुरवठा) - ७६ पदे 

 

मृद व जलसंधारण विभागांतर्गत भरली जाणारी पदे (२६ पदे)

उपविभागीय जलसंधारण अधिकारी - ६ पदे

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) - २० पदे

महसूल व वन विभागांतर्गत भरली जाणारी पदे  (४३ पदे)

सहायक वन संरक्षक - ३२ पदे

वनक्षेत्रपाल - ११ पदे

जाहिरातीची pdf फाइल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story