Raj Thackeray : मी बोलली, चान्स मिळाली अशा उच्चाराने राज ठाकरेंना काय वाटले असेल ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतल्यापासून अमृतावहिनींची चर्चा होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 28 Apr 2023
  • 05:29 pm
मी बोलली, चान्स मिळाली अशा उच्चाराने राज ठाकरेंना काय वाटले असेल ?

मी बोलली, चान्स मिळाली अशा उच्चाराने राज ठाकरेंना काय वाटले असेल ?

अमृतावहिनींच्या उच्चारावरून सुषमा अंधारेंची टीका

#मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतल्यापासून अमृतावहिनींची चर्चा होत आहे.  

राज ठाकरे यांची ही मुलाखत बुधवारी अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे या दोघांनी घेतली. या मुलाखतीची चर्चा होत आहे.  त्यात अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्या उच्चारांवरून टोला लगावला आहे. अमृता फडणवीस या मूळच्या नागपूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठी भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे. अशात राज ठाकरे यांनी त्यांचे काही शब्द करेक्ट केले होते. मुलाखतीत हे सगळ्यांना दिसले. नेमके याच गोष्टीवर बोट ठेवून सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.     

या आधीच्या एका जुन्या मुलाखतीत अमृता फडणवीस असे म्हणताना दिसत आहेत की सुषमा अंधारे या आधी मला माझ्यासारख्या वाटत होत्या. आता त्यांचे बोलणे स्क्रिप्टेड असते. याचा संदर्भ घेत सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच अमृता फडणवीस यांचं मराठी ऐकून राज ठाकरेंना काय वाटले असेल, असा प्रश्नही केला आहे.

काय आहे सुषमा अंधारे यांची फेसुबक पोस्ट ?

अमृतावहिनींना मी त्यांच्यासारखी वाटते, असे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या नजरेने त्यांच्यासारखी वाटत असेल बरे ? कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा सुंदर आहेत. श्रीमंतही आहेत. बाकी मला नरडे आहे, त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यात ? मग मला कधीतरी वाटले की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का?

पण छे ! राज ठाकरेंची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारातील मराठी ऐकले अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असू शकत नाही. मात्र, मराठी मनाचे मानबिंदू असणारे, मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचनाचा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुद्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोलली, मला चान्स मिळाली, या टाईपचे मराठी ऐकून कानात शिसे ओतल्यासाखं झाले असेल.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story