Career: विद्यार्थ्यांनी मर्चंट नेव्ही क्षेत्राकडे वळावे

अहमदनगरः सध्याच्या युगात स्पर्धात्मकता वाढली असून विद्यार्थी आता आरामदायक नोकऱ्यांच्या शोधात भटकताना दिसत आहेत. त्यामुळेच प्रचंड संधी उपलब्ध असताना देखील

Merchant Navy

Career: विद्यार्थ्यांनी मर्चंट नेव्ही क्षेत्राकडे वळावे

डाॅ.उल्हास माळवदे यांचे आवाहन; अहमदनगर येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

अहमदनगरः सध्याच्या युगात स्पर्धात्मकता वाढली असून विद्यार्थी आता आरामदायक नोकऱ्यांच्या शोधात भटकताना दिसत आहेत. त्यामुळेच प्रचंड संधी उपलब्ध असताना देखील मर्चेंट नेव्हीसारख्या चांगल्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचे दुर्लेक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आव्हानात्मक परंतू तितकाच मानसन्मान मिळवून देणाऱ्या मर्चेंट नेव्ही इंजिनिअरिंगकडे वळले पाहिजे, असे मत एमआयटी एडीटी मॅनेटचे डाॅ.उल्हास माळवदे यांनी मांडले.

ते एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे व सेवा इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १२वी सायन्सच्या विद्यार्थी व पालकांसाठी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. ही कार्यशाळा रेसीडेन्सियल महाविद्यालयासमोरील पोलीस बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमात बारावी नंतरच्या उपलब्ध संधी, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे अशा विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून सखोल मार्गदर्शन केले गेले. यावेळी,  प्रा. सुनील चवळे, प्रा. अमित उत्तरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. माळवदे पुढे म्हणाले की, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील गुंतागुंत नीट समजून घेऊन प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे. आवश्यक असणारी कागदपत्रे आत्तापासूनच तयार ठेवावी. प्रवेश प्रक्रियेचा चक्रव्यूह अचूक भेदण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. तसेच स्पर्धा खूप आहे त्यामुळे वेळेचे नियोजन करून उत्तम मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

प्रा. अमित उत्तरकर यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विविध करिअर कोर्सेसची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना सांगितली. ते म्हणाले एमआयटी नेहमीच विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत असते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर निवडीसाठी आणि भविष्यासाठी निश्चितपणे होतो. एमआयटी एडीटी विद्यापीठा मार्फत राबवला जाणारा अभ्यासक्रम औद्योगिक गरजा नुसार अद्ययावत केलेला आहे.

प्रा. सुनील चवळे यांनी मर्चंट नेव्ही या वेगळ्या करिअर संधींची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. मॅनेट पुणे यांच्यामार्फत उपलब्ध असणाऱ्या मरीन इंजिनीअरिंग आणि नॉटीकल सायन्स या कोर्स बद्दल उपयुक्त माहितीही त्यांनी यावेळी करून दिली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक व आकर्षक अशा मरीन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाची निवड करावी. मॅनेट पुणे ही भारतातील एक नामांकित अशी मरीन इंजिनीअरिंग अभ्यासक्रम शिकवणारी संस्था असून जगभरातील विविध शिपिंग कंपन्यांमध्ये आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाला अहमदनगर शहरातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपेश पासपुल यांनी तर आभार सेवा इव्हेंटचे अक्षयकुमार भंडारी यांनी आभार मानले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story