'इंस्टा'वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरले हिरो

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र फेसबुक, ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत आघाडीवर असलेल्या फडणवीसांवर मात करत सध्याच्या पिढीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

'इंस्टा'वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरले हिरो

'इंस्टा'वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरले हिरो

देवेंद्र शिरूरकर

feedback@civicmirror.in

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र फेसबुक, ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत आघाडीवर असलेल्या फडणवीसांवर मात करत सध्याच्या पिढीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

सध्याच्या काळात निवडणुका सोशल मीडियाच्या माध्यमातून लढल्या जातात असे एक वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मात्र, या वाक्याला छेद देणारे निष्कर्ष पुण्यातील मीडिया इनसाईट या संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहेत. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते असलेल्या राज्यातील  २८८ पैकी तब्बल २१ आमदार फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर या प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नसल्याचे समोर आले आहे.  पुण्यातील मीडिया इनसाईट संस्थेने 'सोशल मीडिया प्रेझेन्स ऑफ एमएलएज इन महाराष्ट्र' हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान २८८ सदस्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या तीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंट्सचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार राज्यातील २८८ आमदारांपैकी फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर अनुक्रमे २२२, २६१ आणि २५५ सदस्यांचे १ लाखापेक्षा कमी फॉलोअर्स आहेत.

फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर अनुक्रमे सुधीर मुनगंटीवार, एकनाथ शिंदे, संदीप क्षीरसागर आणि अबू आझमी यांनी क्रमांक पटकावला आहे.  इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ फडणवीस, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि रोहित पवार यांचा क्रमांक येतो, तर ट्विटरवर फडणवीस यांच्यानंतर अनुक्रमे आदित्य ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि धनंजय मुंडे यांचे फॉलोअर्स आहेत.

३० टक्के आमदार ट्विटरवर नाहीत

आपल्या राजकीय भूमिका मांडण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्यासाठी ट्विटरचा वापर केला जातो. देशातील अनेक प्रमुख नेते आपली भूमिका मांडण्यासाठी ट्विटरचा प्रभावी वापर करताना दिसतात, पण राज्यातील २८८ पैकी ८८ म्हणजे ३० टक्क्यांहून अधिक आमदारांचे ट्विटरवर प्रोफाइल नसल्याचे हा अहवाल सांगतो. आकडेवारी पाहिल्यास राज्यातील आमदारांना आपली राजकीय भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्यात रस नाही, असे चित्र दिसते. याशिवाय २८८ विधानसभा सदस्यांपैकी इंस्टाग्रामवर ६६ म्हणजे २२ टक्के, फेसबुकवर ३४ म्हणजे ११ टक्के आमदारांचे फेसबुक पेज नाही.

सोशल मीडियावर फडणवीस-शिंदेमध्येच तगडी स्पर्धा

या अहवालामध्ये फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप फाइव्ह आमदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत बाजी मारली आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी. कारण फेसबुक आणि ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत फडणवीस अव्वल ठरले आहेत. इंस्टाग्रामवर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्या क्रमांकावर असून, त्यांनी फडणवीसांना मागे टाकल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest