मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२.०० वा ते दुपारी २.०० वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.
गॅन्ट्री बसविताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर वळवुन मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुना पुणे- मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट येथुन वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुना पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होतील.