‘कपील पाटील यांच्याऐवजी भाजपाने पाटील िहलाच उमेदवारी द्यावी’

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांचा भाजपला खोचक सल्ला

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 29 Feb 2024
  • 03:03 pm
'BJPshouldnominate

‘कपील पाटील यांच्याऐवजी भाजपाने पाटील िहलाच उमेदवारी द्यावी’

#मुंबई 

भारतीय जनता पक्षाचे भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. तसेच भारतीय जनता पक्षावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी लोककलावंत गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागत असेल तर भारतीय जनता पक्षाने गौतमी पाटीललाच उमेदवारी द्यावी असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. 

सुषमा अंधारे याचे भिवंडी लोकसभा मतदारसंघात मंगळवारी रात्री भाषण झाले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागत आहे. कपिल पाटील यांनी ही एक शक्कल लढवली आहे. मतदारांची गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलला बोलवण्याची पाळी येत असेल तर तुमच्या कामाचा प्रभाव काय राहिला ? अशी स्थिती असेल तर भाजपाने आता गौतमी पाटीलला उमेदवारी द्यायला पाहिजे. कपिल पाटील यांना भाजपाने तिकिट देऊ नये. कपिल पाटील यांची पात्रता नसेल तर थेट गौतमीलाच तिकिट द्या. गौतमी पाटीलने गाणे म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्राचा राडा करायचा, अशी राज्यात स्थिती आहे. नेत्यांनी सगळ्या राजकारणाचा चिखल करुन टाकला आहे, असं म्हणत सुषमा अंधारेंनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन कपिल पाटील आणि भाजपावर टीका केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest