BJP : भाजप इलेक्शन मोडवर

कर्नाटक या शेजारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवाचा दणका बसला असला तरी राज्यात मात्र हा पक्ष निवडणूल लढवण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सोमवारी (दि. १६) स्पष्ट संकेत दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 17 May 2023
  • 06:26 pm
भाजप इलेक्शन मोडवर

भाजप इलेक्शन मोडवर

#पुणे

कर्नाटक या शेजारी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवाचा दणका बसला असला तरी राज्यात मात्र हा पक्ष निवडणूल लढवण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सोमवारी (दि. १६) स्पष्ट संकेत दिले.

महापालिका, विधनासभा, लोकसभा निवडणुकीचे हे वर्ष आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होण्याचे संकेत दिले. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक गुरुवारी (दि. १८) पुण्यात होत आहे. त्यात याबाबत रणनीती ठरणार आहे. यासोबतच भाजप राज्यभरातील निवडणुकीची रणनीतीदेखील पुण्यात होणाऱ्या या बैठकीतून ठरवणार आहे.

राज्य कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने भाजप इलेक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील भाजपच्या दोन नेत्यांनी सोमवारी निवडणुकीचे संकेत दिल्यानंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे शहरात होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहे. यावेळी राज्यातील आमदार आणि खासदारांच्या गटाची ते बैठक घेणार आहे. आगामी महापालिका निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा अन् लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यामध्ये चर्चा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय नड्डा हे राज्यातील मंत्री गटाचीदेखील बैठक घेणार आहेत.

 कनार्टकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी २५ जागा जिंकू : फडणवीस

कर्नाटक निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत चर्चा करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, ‘‘कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो असलो तरी मतांमध्ये फार मोठ्या फरकाने काही फरक पडला नाही. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनमताचा आदर करत आम्ही पराभव मान्य केला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक जिंकता येत नाही, कधी जिंकावं लागतं तर कधी कधी हरावंही लागतं.’’

कर्नाटकच्या निवडणुकीत कुठेही भाजपची मते कमी झाली नाहीत. मी दाव्याने सांगतो की, कर्नाटकमध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक पुन्हा येईल, तेव्हा २८ पैकी २५ जागा भाजप जिंकणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest