महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

ChiefMinisterAshokChavan'sresignationfromCongressmembership

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेली उलथापालथी आणि फोडाफोडीच्या मालिकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र आता अशोक चव्हाण यांच्या राजनाम्यानंतर याला तडा जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तब्बल ११ आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत. या ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

 गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest