नीट, नेट पेपर लीकप्रकरणी मोठी अॅक्शन; NTA च्या महासंचालकांची उचलबांगडी !

नीट आणि नेट सारख्या अतिमहत्वाच्या परीक्षांचे पेपर लीक प्रकरणी (paper leak case) केंद्र सरकारवर टीका होत असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे.

paper leak case)

नीट, नेट पेपर लीकप्रकरणी मोठी अॅक्शन; NTA च्या महासंचालकांची उचलबांगडी !

नीट आणि नेट सारख्या अतिमहत्वाच्या परीक्षांचे पेपर लीक प्रकरणी (paper leak case) केंद्र सरकारवर टीका होत असताना मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटविण्यात आले आहे. प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवे संचालक असणार आहेत. खरोला हे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी होते. आता एनटीएची गेलेली विश्वासार्हता पुन्हा मिळविण्याचे काम खरोला यांना करावे लागणार आहे. 

नुकत्याच झालेल्या NEET आणि UGC-NET परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणावरून एनटीएवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पेपरफुटीवरून सरकारवर विरोधकच नाही तर भाजपाची विद्यार्थी संघटना देखील आंदोलन करत होती. देशभरात विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. यामुळे सरकार अॅक्शनमोडवर आले असून एनटीएच्या महासंचालकांवरच पहिली कुऱ्हाड कोसळली आहे. 

प्रवेश परीक्षा दोषमुक्त व्हाव्यात म्हणून एनटीएची स्थापना करण्यात आली होती. परंतू ही संस्था अपयशी ठरली आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना नेट परीक्षेचेही पेपर फुटल्याचे समोर आले होते. परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही परीक्षा रद्द केल्याची घोषणा सरकारला करावी लागली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१७ मध्ये उच्च शिक्षणात प्रवेशासाठी एकल, स्वायत्त आणि स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली होती. 1 मार्च 2018 ला एनटीएची स्थापना झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest