‘पडद्यावरील आई’ काळाच्या पडद्याआड

रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या पद्मश्री तसेच महाराष्ट्रभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी ऊर्फ सुलोचना लाटकर यांचे (वय ९५) यांचे दादर येथे आज सायंकाळी निधन झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 5 Jun 2023
  • 10:56 am
‘पडद्यावरील आई’ काळाच्या पडद्याआड

‘पडद्यावरील आई’ काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन

#मुंबई

रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या पद्मश्री तसेच महाराष्ट्रभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी ऊर्फ सुलोचना लाटकर यांचे (वय ९५) यांचे दादर येथे आज सायंकाळी निधन झाले.

सुलोचना दिदी यांना ९ मे रोजी रात्री एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तिथे श्वसन आजारावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर शनिवारी (दि. ३) रात्रीपासून त्यांना व्हेंटिलेटर (कृत्रिम जीवरक्षक प्रणाली) वर ठेवण्यात आले होते, अशी माहिती त्याची कन्या कांचन घाणेकर यांनी दिली आहे.

तब्बल ७० वर्षांची समृद्ध कारकीर्द असलेल्या सुलोचना दिदींची प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात ‘चित्रपटातील आई’ अशीच आहे. त्यांनी अनेक चित्रपटांत चरित्र भूमिका  साकारल्या. सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. ती असंख्य रसिकांना भावली.

सुलोचना दिदींचे अनेक चित्रपट खूपच गाजले. १९५३-५४ मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दिदींच्या कारकिर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दिदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलोचना दिदींना १९९९ मध्ये ‘पद्मश्री’, तर २००९ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest