आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुले पत्र

लोकशाहीसाठी आमच्यासोबत या, अन्यथा पुढची िपढी माफ करणार नाही, संविधानाची आठवण करून देत भावनिक साद

AnopenlettertoPrakashAmbedkarfromAhwada

आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुले पत्र

#मुंबई

सध्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावरून मविआतील घटक पक्षांना चांगलेच अडकून ठेवले आहे. आंबेडकरांच्या जागा वाटपाच्या भूमिकेमुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न आता मविआतील नेत्यांनी सुरू केला आहे. त्यात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना खुले पत्र लिहिले आहे.

यामध्ये त्यांनी संविधानाची आठवण करून देताना चर्चेचं आवाहन केले आहे. अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे म्हटले आहे.  मी शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्त्वाचे नेते म्हणून म्हणजेच आपणांकडे पाहिले जात आहे. आपणाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील, यासाठी प्रयत्न करणे अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूयात, अशा शब्दांत आव्हाडांनी आंबेडकरांना भावनिक साद घातली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest