आंबेडकरांचा पवार, राऊतांवर अविश्वास

निवडणुकीनंतर पवार आणि ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत याची खात्री काय? प्रकाश आंबेडकरांचा पत्राद्वारे आव्हाडांना सवाल

PuneMirror

आंबेडकरांचा पवार, राऊतांवर अविश्वास

#मुंबई

संविधानासाठी आम्ही कार्यरत आहोत, मात्र त्यासाठी आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत यायचे आणि निवडणुकीनंतर त्यांनी वेगळे निर्णय घ्यायचे, याला अर्थ नाही. ते तसे करणार नाहीत, हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता का, असा प्रतिसवाल प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.  

महाविकास आघाडीत अद्याप वंचित बहुजन आघाडीत समावेश झालेला असला तरी अद्याप जागा वाटपावरून त्यांच्यात अंतिम निर्णय होत नाही. पण या चर्चेत नेमकी अडचण काय आहे? याबाबत वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी सूचकपणे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना आंबेडकरांनी त्यांना पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाडांच्या पत्राला उत्तर देताना आंबेडकर म्हणतात, आपण लिहिलेले पत्र व्यक्तिगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तिगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने बीजेपीबरोबर समझोता केलेला होता. त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तिगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का, याबद्दल आमच्या मनात शंका आहे.

शरद पवार आणि संजय राऊतांवर शंका?

आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचवण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तिगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच 

बोलले नाहीत, ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला. आपणच फक्त म्हणालात की "लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?" ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत 

यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बघितले 

तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर 

जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला 

द्यावी लागेल. आपण लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का, हे आम्हाला 

माहीत नाही.

तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल, असे स्पष्टपणे प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest