कल्याणसाठी सर्व पक्षांची मोर्चेबांधणी

कल्याणचा लोकसभेचा गड जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचे कारण म्हणजे कल्याणचे सध्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे. त्यांची कोंडी केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होऊ शकते हे जाणून राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी जोदार तयारी सुरू केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 2 Jun 2023
  • 11:17 am
कल्याणसाठी सर्व पक्षांची मोर्चेबांधणी

कल्याणसाठी सर्व पक्षांची मोर्चेबांधणी

राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे) आणि भाजपचाही मतदारसंघावर डोळा, सर्वच पक्ष लागले तयारीला

#नवी मुंबई 

कल्याणचा लोकसभेचा गड जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचे कारण म्हणजे कल्याणचे सध्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे. त्यांची कोंडी केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होऊ शकते हे जाणून राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी जोदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाकडून ही जागा भाजपला सोडली जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय झाली असून कल्याण लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आनंद परांजपे हे २०१४ मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे उपस्थित होते. आमदार आव्हाड यांना कल्याण लोकसभेच्या जागेविषयी परांजपे यांचे नाव चर्चेत आहे, असे विचारण्यात आले असता त्यांनी परांजपे कल्याणमध्ये येतील का माहिती नाही, पण येथे आनंदाचे वातावरण नक्की असेल, असे सांगत अप्रत्यक्षरित्या आनंद यांच्या नावास प्राधान्य असल्याचे सूतोवाच दिले.कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अभेद्य राखण्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत.महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट नसले तरी राष्ट्रवादीसोबत ठाकरे गट या जागेसाठी इच्छुक आहे. ठाकरे गटाकडे धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा आल्यास आनंद परांजपे हे धनुष्यबाण या चिन्हावरच कल्याणमध्ये निवडणूक लढू शकतात .

ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे येथून इच्छुक असून मागील विधानसभेत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. त्यानंतर मात्र ही चर्चा थंडावली. दोन वर्षातच शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भोईर हे ग्रामीण भागात पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांच्या कामाचा धडाका पाहता ते खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावलेल्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख कार्यकर्त्यांनी केल्याने या सर्व चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. आत्तापर्यंत आपल्याकडे नसलेल्या मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. मिशन महाराष्ट्र अंतर्गत १६  मतदारसंघाची  निवड करत भाजपने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकेल, असे संकेत दिले आहेत.   शिंदे गट व भाजपची युती असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा केल्यास विद्यमान खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला ही जागा दिली जाईल. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळवा ते अंबरनाथपर्यंत आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहापैकी तीन मतदारसंघ डोंबिवली, उल्हासनगर आणि कल्याण पूर्व हे भाजपकडे आहेत. पूर्वेत भाजप समर्थक अपक्ष आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, तर अंबरनाथमध्ये शिवसेनेची (शिंदे गटाचे) सत्ता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest