संग्रहित छायाचित्र....
Shirdi Saibaba 2024/25 (Ahmednagar) : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टतर्फे ख्रिसमसची सुट्टी, नवीन वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 25 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 या कालावधीत शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात शिर्डी साईबाबांच्या विशेष दर्शनासाठी तसेच सर्वसामान्य भाविकांसाठी व्हीआयपी पासेसची व्यवस्था करण्यात आली होती.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डी साई दरबारी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात भरभरुन दानही दिलं. नाताळच्या सुट्ट्या व नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान म्हणजेच 9 दिवसांच्या उत्सवात 8 लाखांहून अधिक साई भक्तांनी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले, यादरम्यान साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांकडून एकूण 16 कोटी 61 लाख 80 हजार रकमेचे दान करण्यात आलं आहे.
यामध्ये देणगी काऊंटर वरुन 03 कोटी 22 लाख 27 हजार 508 रुपये प्राप्त झाले तर पीआरओ सशुल्क देणगी पासेसचे 01 कोटी 96 लाख 44 हजार 200 रुपये तर दक्षिणा पेटीतून 06 कोटी 12 लाख 91 हजार 875 रुपयांचे दान साईचरणी अर्पण झालं आहे.तसेच डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डर या स्वरूपातून 04 कोटी 65 लाख 73 हजार 698 रूपये प्राप्त झाले आहेत.
सोनं-चांदीच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात दान प्राप्त झालं आहे.
सोने 809.220 ग्रॅम - 54 लाख 49 हजार 686 रुपये
चांदी - 14398.300 ग्रॅम - 09 लाख, 93 हजार 815 रुपये
9,47,750 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री....
तसेच या कालावधीत 06 लाखांहून अधिक साई भक्तांनी श्री साई प्रसादालयात मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. 1 लाख 35 हजारांहून अधिक साई भक्तांनी खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा लाभ घेतला आहे. यासह 09,47,750 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली असून 1 कोटी 89 लाख 55 हजार रुपये मिळाले आहेत. तसेच 5,98,600 साई भक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पॅकेटचा लाभ घेतला.