chhagan bhujbal
मंत्रीमंडळ विस्तारानंतर नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध घटनांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. आरोप सिद्ध झालेलं नाहीत. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण अयोग्य असल्याचे भुजबळ यांनी मत व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट अन् परदेश दौऱ्यानंतर भुजबळ यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज्यभरात सुरु असलेल्या तोष देशमुख हत्याप्रकरणावर भाष्य केलं. यावेळी देशमुख हत्याप्रकरणी जो दोषी असेल त्याला फाशी द्या. कुणावर अन्याय होता कामा नये. असं म्हणत धनंजय मुंडेंचे समर्थन केलं. तसेच, मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यावर भाष्य करताना 'कुणाच तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नकोय.' अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांचे नाव येत आहे. इतकेच नव्हे तर त्यांची मंत्रीपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी, अशी मागणीदेखील होत आहे. मात्र, भुजबळ यांनी त्यांचा राजीनामा घेण अयोग्य असल्याचे म्हटलं आहे. चौकशीत कोण सापडले, आका काय काका काय त्या सर्वांवर कारवाई करू. पण त्यापूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागाताय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, मुख्यमंंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या प्रकरणाची पुर्ण चौकशी करणार आहेत.
भुजबळ म्हणाले, धनंजय मुंडेंविरोधात चौकशीत काही समोर आलं आहे, आरोप सिद्ध झालेलं नाहीत. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण अयोग्य आहे. मंत्रिपद काय सहज मिळत नाही. मुंडेंविरोधात माहिती असेल तर पोलिसांना द्या. उगाच साप साप म्हणून भूई थोपटणं योग्य नाही. मी देखील अशा परिस्थितीतून गेलो आहे. तेलगीला पकडलं पण मला राजीनामा द्यावा लागला. असं म्हणत त्यांनी या प्रकरणी खंत व्यक्त केली. देशमुख हत्याप्रकरणी जो दोषी असेल त्याला फाशी द्या. कुणावर अन्याय होता कामा नये. कुणीही कायदा हातात घेऊ नये. असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
तर मला मंत्रीपद नकोय.....
माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यांचा राजीनामा घेऊन तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा, राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या स्वप्नातही येणार नाही.
मी ही अशा परिस्थितीतून गेला आहे....
2003 मध्ये तेलगीला पकडलं मी, त्याच्यावर मोक्का दाखल केला मी. माझ्यावर आरोप लागल्यावर माझा राजीनामा घेण्यात आला. तेव्हा मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. राज्य आमचं होतं. पण परिस्थिती पाहून मीच सुप्रीम कोर्टाता गेलो. सुप्रीम कोर्टाच्या माध्यामातून ही केस सीबीआयला गेली. तेव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं. सीबीआयने चौकशी केली. त्यांनी सांगितलं. तुमचा काहीही दोष नाही. माझं नाव चार्जशीटमध्ये नव्हतं. माझं पद गेलं, डाग लागला. मनस्ताप झाला. पण त्यानंतर पवार साहेबांनी मला मंत्री केलं. मी ते भोगलं आहे. कारण नसताना, सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं योग्य नाही” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.