Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं API च्या आलं अंगलट; महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी

मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराडसोबत API चे फोटो समोर आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 6 Jan 2025
  • 03:21 pm
Beed,Walmik Karad,Sushma Andhare,Prajakta Mali,Sushma Andhare On Prajakta Mali,Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case,Devendra  Fadnavis,Santosh Deshmukh Murder Case,Santosh Deshmukh,MAHARASHTRA GOVERMENT,Dhananjay Munde,Pankaja  munde,वाल्मिक कराड, संतोश देशमुख हत्या प्रकरण, बीड, संतोष देशमुख, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार, पोलीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे, प्राजक्ता माळी

Santosh Deshmukh Case

गेल्या काही दिवसांपासून राज्याभरात संतोष हत्याप्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातले वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराडसोबत API चे फोटो समोर आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

 

 एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ.बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला. त्यांच्या या दाव्यानंतर पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आणि एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी केली. तसेच महेश विघ्ने यांच्यासह हवालदार मनोज वाघ यांच्यावरही कारवाई करण्यात आली. 

 

राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. 

 

आव्हाड यांचे ट्विटमध्ये नेमकं आहे तरी काय?

संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? 

याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता आसल्या प्रमाणे काम केलेले आहे.

 

दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराड चा आत्यंत खास माणुस आसुन गेले १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय.

Share this story

Latest